विद्या घेणार १४ डिसेंबरला सात फेरे

गेल्या काही दिवसापासून एक्ट्रेस विद्या बालन आणी सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या लग्नाची चर्चा सर्वात जोरात सुरु होती. तसे पहिले तर गेल्या काही दिवसापासून कुणालाच न सांगता विद्या लग्नाची तयारी करीत होती. विद्याने लग्नासाठी वेन्यू आणि पाहुणेमंडळीची लिस्ट सुद्धा सीक्रेट ठेवली होती. मात्र लग्नाची गोष्ट किती ही लपवून ठेवली तर ती लपत नाही. विद्याचे हे सिक्रेट आता ओपन झाले असून ती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत १४ डिसेंबर रोजी मुंबईतील चेम्बूर परिसरातील सुब्रमनियन समाजाच्या मंदिरात सात फेरे घेणार आहे.

विद्या काही तिच्या जवळचे मित्र व परिवारासोबत संगीत सेरमनी सेलिब्रेट करण्यासाठी गेल्यानंतर तिची गाठ काही मिडियावाल्याशी पडली. याच वेळी तिच्या लाग्नाची बातमी फुटली. विद्या बालनचे लग्न पंजाबी आणि साउथ इंडियन या दोन्ही पद्धतीच्या रीति रिवाजानुसार होणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर पंजाबी आहे आणि विद्या बालन तमिळ आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

१४ डिसेंबर रोजी विद्याचे लग्न दक्षिण भारतीय रीती रिवाजानुसार मुंबईतील चेम्बूर परीसरातील सुब्रमनियन समाज मंदिरात सकाळी पार पडणार आहे. विद्याने तिच्या लग्नासंबधातील फंक्शन खूप गुप्त ठेवले होते. त्यासठी तिने दुरच्या नातेवाईकांना बोलावले नाही. लग्नाची गोपनीयता ठेवण्यासाठी तिने परिवारातील कित्येक सदस्याना पण कार्ड दिले नाहीत. लग्नापूर्वी ती काही तास अगोदर फोन अथवा मेसेज करून जवळच्या नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण देणार असल्याचे समजते.