आता कंगना करणार मुजरा

इंडस्ट्रीजमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीची एकदा तरी मुजरा करण्याची मनोमन इच्छा असते. सर्वजन अशी संधी कधी मिळते याचीच वाट पाहत असतात. हे संधी आता अभिनेत्री कंगना रानावतला मिळाली आहे. डायरेक्टर विश्वास पाटिल ‘रज्जो’ या सिनेमाची निर्मिती करीत असून या सिनेमात कंगना ही मुजरा डान्स करणार आहे. नुकतीच तिला ही ऑफर देण्यात आली होती. तिने ही ऑफर स्वीकारली असून ती ‘रज्जो’ या सिनेमात आता मुजरा करताना दिसणार आहे.

याबाबत बोलताना ‘रज्जो’ या सिनेमाचे डायरेक्टर विश्वास पाटिल म्हणाले, ‘कंगना ही खरोखरच प्रतिभाशाली नायिका आहे. त्यामध्ये काहीच वाद नाही. तिच्याकडे असलेली परंपरागत भारतीयता पाहून मी प्रभावित झालो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिच्यातील काही परंपरागत गुण बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मुजरा या प्रकारला आपल्याकडे खूपच महत्व आहे. गेल्या काही दिवसपासून भारतीय मुजरा संस्कृतिचे अस्तित्व संपल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी या मुजरा या प्रकारचा डान्स सिनेमात ठेवला आहे.’

अभिनेत्री कंगना सुद्धा थोडासा वेगळा रोल करण्यास मिळत असल्याने खुश असून अशा प्रकारचा मुजरा ती पाहिल्यदाच करीत असल्याने ती उत्साहित आहे. या सिनेमात महेश मांजरेकर किन्नरचा रोल करीत असून प्रकाश राज हे राजकिय व्यक्तीचा रोल करणार आहेत. या सिनेमाची निर्मिती ‘फोर पिलर्स एंटरटेंमेंट’ बैनरच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या सिनेमाचे शूट पुढील वर्षी सुरु होणार आहे.