हफीझ मोहम्मदची हिना रब्बानींवर टीका

इस्लामाबाद दि. ६ – मुंबईवरील हल्ला प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला लष्करेचा संस्थापक हफीज मोहम्मद याच्याविरोधात भारताने पुरावे दिले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगणार्यात पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी यांच्यावर हफीजने चांगलचे तोंडसुख घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाक सरकार काश्मीर प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरला आहे आणि त्यावरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी असली विधाने केली जात आहेत असे त्याचे म्हणणे आहे.

हफीजच्या म्हणण्यानुसार मुंबई हल्यात त्याचा मुख्य रोल होता हे सिद्ध करण्यासाठी भारताने जे पुरावे सादर केले ते लाहोर उच्चन्यायालयाने फेटाळले आहेत. ही घटना घडून चार वर्षे झाल्यानंतरही भारत सबळ पुरावा देण्यात अपयशी ठरला आहे. जी कागदपत्रे पुरावा म्हणून दिली गेली ती न्यायालयात टिकली नाहीत. अमेरिकेने लष्करे तैय्यबावर बंदी आल्यानंतर जम्मद उद दवा ही संघटना हफीजने सुरू केल्याचे व तोच त्याचा प्रमुख असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याला सहा महिन्यांपेक्षा कमी काळ स्थानबद्द केले गेले होते मात्र लाहोर हायकोर्टाने त्याची सुटका केली होती.