अभिनेता अक्षय कुमार मुलगा आरववर सिने क्षेत्रात सहभागी होण्यासाठी दबाव टाकणार नसल्याचे स्पष्ट केले. करियर निवडीसाठी मी त्याला पूर्णपणे स्वतंत्र दिले आहे. अजून तो १० वर्षाचा असून यापुढील काळात त्याला काय व्हायाचे आहे त्याचे त्यानेच ठरवायचे आहे. त्याचे मी समर्थन करणार असल्याचे अक्षयकुमारने यावेळी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले.
करियरसाठी आरववर दबाव नाही – अक्षयकुमार
याबाबत अधिक बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘आरवला काय व्हायचे आहे याचा निर्णय तो स्वताच घेईल. त्याला जर अभिनेता व्हायचे असेल तोच याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. त्याला काय व्हायचे आहे तो होऊ शकतो. त्याला जर चिकित्सक अथवा वकील व्हायचे असेल तर होऊ शकतो. त्यासाठी मी त्याच्यावर कसलाच दबाव टाकणार नाही. त्याला आगामी काळात मी मदतच करेन.’
अक्षय- आणि ट्विंकलला आरव आणी मुलगी नितारा ही दोन मुले आहेत. अक्षय कुमार गेल्या काही दिवसापासून त्याच्या ‘खिलाड़ी ७८६’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. आशीष मोहन द्वारा दिग्दशीत हा सिनेमा येत्या ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून त्याला खूप काही अपेक्षा असून या बहुचर्चित सिनेमातील त्याचा रोल थोडासा हटके असल्याने प्रेक्षकाना पसंद पडेल असे ही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
