काही दिवसापुर्वीच हॉलीवूड मधिल तब्बुचा बहुचर्चित ‘लाइफ ऑफ पाई’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या हॉलीवूडमधील सिनेमातील अनुभव शेअर करताना तब्बू म्हणाली की, हॉलीवूड मधिल सिनेमाच्या तुलनेत हिंदी सिनेमात काम करताना जास्त कम्फर्टेबल वाटते. हिंदी सिनेमात काम करताना इंडस्ट्रीशी असलेली जवळीक व काम करताना होणारा आनंद व्यक्त करण्यास माझ्याकडील शब्द सुध्दा अपुरे पडतील.
बॉलीवूड व हॉलीवूडच्या सिनेमात काम केल्याने आलेला अनुभव सांगताना तब्बू म्हणाली की, हिंदी सिनेमासृष्टी सोडून दुसरीकडे काम करण्याची मी कल्पनाच करू शकत नाही. मला स्वताला हिंदी येत असल्याने माझ्या भावना मी सहजपणे व्यक्त करू शकते व त्याप्रमाणे मला अक्टिंग करता येते. डायरेक्टर जर मला इंग्रजी भाषेत काम करण्याच्या सूचना देत असेल तर मला समजणे अवघड जाते होते. ते समजण्यासाठी मला खूप वेळ लागत होता. मात्र हिंदी सिनेमात काम करताना ही अडचण येत नाही.’
गेल्या काही दिवसापासून बराच काळ कैमरा पासून दूर राहिल्याने काय वाटते असे तब्बूकडे विचारणा केला असता ती म्हणाली, ‘ गेल्या तीन-चार वर्षापासून हैदराबाद येथील घराचे डिजाइन करण्याच्या कामात बिजी आहे. दरम्यानच्या काळात मी काही तेलुगू सिनेमामध्ये काम केले आहे. तसे पहिले तर नेहमीच प्रवास केला तर विचार करण्यासाठी वेळ मिळतो व नवीन काही तर सुचते असा माझा आजपर्यतचा अनुभव आहे. त्यामुळेच मी नेहमी ट्रैवल करीत असते, विशेष म्हणजे मी नेहमीच विदेश यात्रा करते.’