सलमान ऐश्वर्या दिसले एकत्र

तसे पाहिले तर कैटरीना कैफ बॉलीवूडमध्ये आल्यापासून सल्लू मियां ऐश्वर्या रॉयला विसरून गेला आहे. ऐश सध्या तिच्या जीवनात खुश आहे. ऐशचे सर्व लक्ष सध्या परिवारावर आहे. तीने खास करून सिनेमापेक्षा आता तिची मुलगी अराध्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर सल्लू मियांदेखील गेल्या काही दिवसापासून त्याच्या सिनेमाच्या शुटमध्ये व्यस्त आहे.

दोनच दिवसापूर्वी मात्र सलमान आणि ऐश्वर्या दोघेही बांद्रा येथील महबूब स्टूडियोमध्ये शूट साठी आले होते. यावेळी दोघेही एकमेकाशी बोलले नाहीत. ऐश याठिकाणी हेयर प्रोडक्टच्या शूटिंगसाठी आली होती, तर सलमान तिच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमाबाबत मीडियाशी चर्चा करीत होता.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या महबूब स्टूडियो मध्ये दुपारी १२.३० वाजता पोहचली. ती स्टेज नंबर तीनवर शूटिंग करीत होती. तर सलमान ४ वाजता महबूब स्टूडियो मध्ये पोहचला तो स्टेज नंबर एकवर उपस्थित होता. ऐश शूट संपवून ७ वाजता त्या ठिकाणून निघून गेली तर सलमान रात्री उशिरापर्यंत त्यठिकाणी उपस्थित होता. याठिकाणची सिक्यॉरिटी एकदम कडक होती. त्यामुळे मीडियाला याठिकाणी ऐश्वर्या आल्यानंतर अथवा जाताना एक ही फोटो काढता आला नाही.