मुंबई/पुणे दि.३०- दरवर्षी नूतनीकरणाची कटकट आणि असल्या पॉलीसीतून विमा एजंटांना मिळणारा अत्यल्प लाभ यामुळे दुचाकी वाहनांचा विमा बरेच वेळा लॅप्स होताना दिसतो. परिणामी वाहन अपघातग्रस्त झाले तर विम्याचे संरक्षण नसते. तसेच या अपघातात दुसर्यााच व्यक्ती ला इजा झाली तर तो खर्च वाहनमालकाला करावा लागतो. दुचाकी वाहन विम्यासंबंधीच्या या सर्व गैरसोयी नष्ट करण्यासाठी चार चाकी वाहनांप्रमाणेच आता दुचाकी वाहनांसाठीही वन टाईम इन्शुरन्सचा विचार विमा कंपन्या करत आहेत. इतकेच नव्हे तर जनरल इन्शुरन्स कौन्सिलने त्यासंबंधात अर्थ मंत्रालयाशी चर्चाही केली असल्याचे समजते.
दुचाकीसाठीही लवकरच वन टाईम इशुरन्स
सध्या दुचाकी वाहनांसाठी १ वर्षे मुदतीचा विमा घेतला जातो. त्याऐवजी तो दीर्घकालीन म्हणजे किमान १० वर्षांच्या मुदतीसाठी घेतला जावा अशी ही योजना आहे. दुचाकी वाहन विम्यात थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणार्यां चे प्रमाण अधिक आहे आणि हा विमा कायद्याने आवश्यकही आहे. या विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम तुलनेने कमी असते मात्र वर्षभरात हा विमा नूतनीकरण केला गेला नाही तर पॉलिसी रद्द होते. विमा एजंट या विम्यातून अत्यल्प लाभ होत असल्याने ग्राहकांना विमा नूतनीकरण करण्यास प्रोत्साहन देत नाहीत असेही आढळते. त्यामुळे आता वर्षभर मुदतीऐवजी दीर्घ कालीन मुदतीचा विमा देण्याचा विचार सुरू आहे.
ग्रामीण भागातही दुचाकींची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आज काल विमा कंपन्या ऑनलाईन विमा सुविधा देत असल्या तरी ग्रामीण भागात ही सोय असतेच असे नाही कारण तेथील जनतेला या प्रकाराची माहितीच नसते.हे सर्व टाळण्यासाठी दीर्घकालीन मुदतीचा विमा उपयुक्त ठरणार असल्याचे विमा तज्ञांचे मत आहे.
