
नवी दिल्ली दि.२८ – राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकांसाठी स्थापण्यात आलेल्या निवडणूक समन्वय समितीने निवडणुकांत अधिक लक्ष केंद्रीत करण्याची पाच राज्ये निश्चित केली असून मध्यप्रदेश, ओडीशा, छत्तीसगढ, झारखंड आणि कर्नाटक राज्यांचा त्यात समावेश आहे. ओडिशा वगळता बाकी चारी राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे तर ओडिशात बिजू जनता दलाचे सरकार आहे. या पाच राज्यात लोकसभेच्या ९३ सीटस आहेत.
