कैटरीना करणार ज्युलिया रॉबर्टची बरोबरी

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफ सध्या भलतीच खुश आहे. बॉलीवूडवर राज्य करणारी कैटरीना जाहिरातीतसुद्धा नंबर वन आहे, काही दिवसापुर्वी एका पुरस्कार सोहळ्यात तिची तुलना हॉलिवूडची मादक अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टसोबत करण्यात आली. त्यावेळी कॅट उपस्थितांचे आभार मानले.

याबाबत बोलताना कैटरीना म्हणाली, ‘ज्युलिया माझी आवडती स्टार आहे. तिच्याशी माझी तुलना झाल्याने मी खुश आहे. तिच्याप्रमाणे मलाही प्रेक्षकांच्या भावना कळतात. प्रेक्षकांच्या अपेक्षेवर मी खरी उतरण्याचा प्रयत्न करत आहे. आगमी काळात अब्ण्यावर लास्ख केंदित करणा असल्यचे तिने स्पष्ट केले. ‘ गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये कैटरीनाची चलती आहे. येथील तिन्ही दिग्गज खानांसोबत तिने काम केले आहे आणि ते सर्वच सिनेमे सुपरहिट झाले आहेत. सलमान खानसोबतचा ‘एक था टायगर’ सुपरहिट ठरला. सिनेमाने शंभर कोटींचा व्यवसायसुद्धा केला. अलीकडेच आलेला शाहरुख खानसोबतचा ‘जब तक है जान’सुद्धा हिट ठरला. सिनेमा अजूनही चांगला व्यवसाय करत आहे, तर आमिर खानसोबत ती ‘धूम 3’ मध्ये काम करत आहे. ‘धूम 3’ सुद्धा हिट होईलच, असा तिला विश्वास आहे.

ज्युलिया रॉबर्ट्स हॉलिवूडसह जाहिरात क्षेत्रातसुद्धा तिची चांगली पकड आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील विश्वसनीय चेहरा म्हणून कैटरीना पुढे आली आहे . कैटरीना मेहनती आणि प्रतिभावंत आहे. आपल्या अभिनय कौशल्याने पुढे आली आहे. हिंदी येत नसूनसुद्धा तिने बॉलिवूडच्या अनेक चेह-यांना मागे टाकले. त्यामुळे तिची बरोबरी ज्युलिया रॉबटशी केल्याने ती भलतीच खुश आहे.