वानखेडे स्टेडियमवरील दुस-या कसोटी सामान्यत टीम इंडियाचा इंग्लंडने दारूण पराभव केला. इंग्लंडने भारतावर दहा गडी राखून विजय मिळवित चार कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या ५७ धावा १० षटकांमध्येच काढल्या आणि भारतावर विजय मिळविला.
टीम इंडियाच्या फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केल्याने पराभव पत्काराव लागला. कालच्या ७ बाद ११७ वरून पुढे डाव सुरु केला असता हरभजन सिंग आणि जहिर खान व गंभीर झटपट बाद झाले. भारताचा डाव केवळ १४२ धावावर आटोपला. गंभीरने ६५ धावांची झुंझार खेळी केली. परंतु, दुस-या बाजुने फलंदाज तग धरू शकलेच नाही. मॉन्टी पानेसरने दुस-या डावात ६ फलंदाज बाद केले. या सामन्यात त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत. ग्रॅहम स्वानने या डावात चार बळी घेतले.त्यानंतर कर्णधार एलिस्टर कुक १८ तर निक कॉम्प्टन ३० धावांवर नाबाद होते. कुकने पहिल्या डावात तडाखेबाज शतक झळकाविले होते. त्याने केविन पीटरसनसोबत केलेली द्विशतकी भागीदारी सामन्याला ख-या अर्थाने कलाटणी देणारी ठरली. दुस-या डावात मॉन्टी पानेसरने भारताच्या दिग्गज फलंदाजांचे पितळ उघडे पाडले.
उर्वरित दोन सामन्यात टीम इंडियाची कामगिरी कशी राहणार यावर मालिकेत कोण विजयी हे हे ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात आता कोणता संघ विजयी ठरणार याकडे लक्ष लागले आहे.