केंद्र सरकार घेतय अंतिम श्वास: गडकरी

आगरताळा: काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार अंतिम श्वास घेत असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संपुआ आघाडीचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे; तर भाजप शासित राज्यात नागरिकांना विकासाची फळे चाखायला मिळत आहेत; असा दावा करून गडकरी म्हणाले की; केंद्रात भाजप सत्तेवर येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भाजप सत्तेवर आल्यावर सुशासन प्रदान करेल आणि सामाजिक सलोख्याचे वातावरणही अनुभवायला मिळेल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माओवाद आणि नक्षलवादाच्या प्रसारामुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे मत व्याक्र करून गडकरी यांनी बांग्ला देशातून आसाम व अन्य सीमावर्ती भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी बांग्लादेशाला लागून असलेल्या सीमा सील करण्याची आवश्यकताही प्रतिपादन केली.