आर. अश्‍विनचा नवा विक्रम

टीम इंडियाने पहिल्या कसोटीत पाहुण्‍या इंग्‍लंड संघाला चारी मुंड्या चीत केले. टीम इंडियाच्‍या फिरकीसमोर इंग्‍लंड संघाची त्रेधातिरपठ उडाली. चेतेश्‍वर पुजाराने मात्र फिरकी आणि वेगवान गोलंदाजी खेळून काढत भारताला पहिला विजय मिळून दिला. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्‍विनने अवघ्‍या नऊ कसोटी सामन्‍यात ५० विकेट घेण्‍याचा विक्रम कला आहे. कमी सामन्‍यात ५० विकेट घेणारा तो जगातील पहिलाच ऑफस्पिनर ठरला आहे.

टीम इंडियाने पहिल्‍या डावात ५२१ धावाचा डोंगर उभा केला होता. इंग्‍लंडचा पहिला डाव अवघ्‍या १९१ धावात संपुष्‍टात आला. दुस-या डावात त्‍यांनी ४०६ धावा करता आल्या. टीम इंडियाने ७७ धावांचे आव्‍हान सहज पार करीत दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

चेतेश्‍वर पुजाराने सहाव्‍या कसोटीतच द्विशतक लगावून रिकी पॉंटिंग आणि राहुल द्रविडला मागे टाकले. हे तिघेही तिस-या क्रमांकावरील फलंदाज आहेत. मात्र, दोघांनाही द्विशतक लगावण्‍यास तीसपेक्षा जास्‍त सामने लागले. दुसरीकडे फिरकी गोलंदाज आर अश्‍विनने मात्र कमाल केली ९ सामन्‍यात ५० विकेट घेण्‍याचा विक्रम त्याने आपल्‍या नावे केला आहे. एवढया कमी सामन्‍यात ५० विकेट घेणारा तो एकमेव ऑफस्पिनर ठरला आहे. त्याच्या या कामगीरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यापूर्वी अशा प्रकारचा विक्रम करणे जाग्तीक्कोन्त्य्च खेळाडूला शक्य झाले नाही.