सैफकडे नाही हनीमूनला वेळ

सैफ आणि करीनाचे लग्न देशातील सर्वात मोठे इवेंट ठरले आहे. अक्टूबरमध्ये लग्न केल्यानंतर सैफ एक महीने सुट्टी घेऊन पुन्हा कामावर परतला आहे. सध्या सैफकडे हनीमूनसाठी वेळ नसल्याने त्याने कोठे जायचे हे ठरवले नाही. सध्या तरी दोघाकडे वेळ नाही. ज्यावेळी त्यांना वेळ भेटेल त्यावेळी करीनाला सोबत घेऊन हनीमूनसाठी वेळ काढणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या सैफ अली खानच्या रेस या सिनेमाच्या सीक्वलचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. आता फक्त डबिंगचे काम उरले आहे. हे काम जानेवरी महिन्यात पूर्ण होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जानेवरी महिन्यानंतर सैफ अली खानकडे वेळ आहे. जानेवारीनंतर हनीमून एन्जॉय करण्यचा विचार सैफ आणि करीना करीत आहेत.

करीना म्हणाली, ‘ सध्या तरी मुलाच्या बाबतीत काही विचार केलेला नाही. लग्नानंतर पहिल्यदा करीना एका सॉफ्ट ड्रिंकच्या प्रमोशनल इवेंट मध्ये सहभागी झाली होती. यावेळी काही पत्रकारांनी छेडले असता ते म्हणली. मी आता ३२ वर्षाची असून सध्या तरी तसा काही प्लान नाही’ लग्नापूर्वी मी पाच वर्ष मी सैफ सोबत लिव-इन रिलेशनशिमध्ये होतो. त्यामुले सैफसोबत लग्नाचा निर्णय घेतला.