किंग आणि टायगरमधील वाद मिटला नाही

दोनच दिवसापूर्वीच बॉलिवुड स्टार व किंग असलेल्या शाहरुख खानने त्याच्या ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या प्रीमियरसाठी बॉलीवूडचा टायगर सलमानला बोलावले होते. त्यावेळी सलमान खानने व शाहरुखसोबत डान्सही केला होता. त्यामुळे दोघानीही आता जुळवून घेतले आहे असे वाटत होते. त्यानंतर शाहरुख्नने केलेले ‘ट्वीट’ पाहता. त्यावरून या दोघातील वाद मिटेल असे वाटत नाही.

२००८ साली कैटरीना कैफच्या वाढदिवसानिमित आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवेळी शाहरुख आणि सलमानमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघामधील नातेसंबध काहीसे बिघडले होते. त्यामुळे दोघांनी एकमेकशी अबोला धरला होता. एकमेकाच्या समोर येण्यास ही दोघे टाळत होते. या दोघातील वाद मिटवन्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांच्यातील वाद काही मिटला नव्हता.

दिवंगत यश चोप्रा यांच्या डायरेक्शन खाली तयार करण्यात आलेला त्यांचा शेवटचा सिनेमा ‘जब तक है जान’ च्या प्रीमियर वेळी शाहरुख आणि सलमान एकत्रित आले होते. यावेळी दोघांनी सोबतच डान्स केला. त्यामुळे दोघांनी झाले गेले विसरून आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला असावा असे सर्वाना वाटत होते. मात्र, शाहरुख याबाबत बोलताना म्हणाला की, अजून दोघातील वाद मिटलेला नाही आणि वाद मिटला तरी याबाबत सार्वजनिकरित्या चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे.