भारतीय संघाने मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळ्ल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये दूस-या दिवशी चहापानापूर्वी ६ गडी बाद ५०२ धावाचा डोंगर उभा केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा चेतेश्वर पुजारा ( १९६) आणि आर आश्विन (२०) धावा काढून नाबाद होते. आजच्या खेळाचे विशिष्ट म्हणजे चेतेश्वर पुजाराचे दुसरे कसोटी शतक व युवराज सिंगचे अर्धशतक ठरले
दुस-या दिवसही खेळ सुरु झाला तेंव्हा पुजारा आणी युवराजने दमदार फलंदाजी करताना पाचव्या विकेटसाठी १२७ धावाची भागीदारी केली. भारताने पहिल्या दिवशी चार गडी बाद ३२३ धावा केल्या होत्या. खेळास सुरुवात केली तेंव्हा पुजारा ( ९८) आणी युवराज (२४) धावावर नाबाद होते. पुजाराने लगेचच स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी सामन्यातील दुसरे शतक आहे. त्यानंतर युवराजने दमदार खेळी करत अर्धशतक झळकावले, त्याला समित पटेलने बाद केले.
त्यानंतर फलंदाजीस आलेला कर्णधार धोनी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर पूजारा आणि आर. आश्विन यांनी काही काळ डाव सावरून ६ गडी बाद ५०२ धावाचा डोंगर उभा केला आहे. पुजारा नाबाद १९६ धावा काढून द्विशतकाकडे वाटचाल करीत होता. इंग्लंडकडून समित पटेलने एक तर स्वानने ५ फलंदाज बाद केले,