ईशांत शर्माला ताप; डिंडाला बोलावणे

गुरुवारपासून भारत-इंग्लंडविरुद्च्या पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला एक झटका बसला असून जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा सध्या तापीने आजारी आहे. त्यामुळे बीसीसीआयने बंगालचा जलदगती गोलंदाज अशोक डिंडाला स्टैंड बाय म्हणून बोलवले आहे.

जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा गुढघ्याला जखम झाली असल्याने बराच दिवस संघाबाहेर होता. तीन महीन्यापूर्वी झालेल्या न्यूजीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती. मात्र त्यावेळी संघात जहीर खान आणि उमेश यादव असल्याने त्याला संघात स्थान मिळले नव्हते. स्टैंड बाय म्हणून बोलविण्यात आलेल्या डिंडाने आतापर्यंत १० वनडे आणि पाच टी-२० सामने खेळले आहेत. मात्र त्याला आतापर्यंत टेस्ट टीममध्ये सहभागी होण्यची संधी लाभली नाही. डिंडाने यावर्षी प्रथम श्रेणी सामण्यात शानदार प्रदर्शन केले आहे.

तसे पहिले तर ईशांत अथवा डिंडा या दोघचीपण टीममध्ये सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. जहीर आणि उमेश यादव हे दोन जलदगती गोलंदाज संघात आहेत. त्याशिवाय दोघे फिरकी गोलंदाज संघात सहभागी होऊ शकतात. अंगात ताप असलेल्या कारणामुळे ईशांतने मंगळवारी सराव केला नाही, तर जहीरच्या फिटनेसबातीत अजूनही संशय कायम आहे.