कैटने केले पाच किलो वजन कमी

गेल्या काही दिवसापासून साइज झिरो ट्रेंड बॉलीवूडमध्ये पूर्वीसारखा पॉप्युलर राहिला नाही. आता सगळ्याच बॉलिवुड हिरोइनच्या डोक्यावरील साइज झिरो ट्रेंडचे भूत उतरलेले दिसत आहे. मात्र आता नव्यानेच आता यामध्ये कैटरीना कैफचे नाव समविष्ट झाले आहे. ‘धूम 3’ या सिनेमामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला टक्कर देण्यासाठी कैटने दोन महिन्यात पाच किलो वजन कमी केले असल्याचे समजते.

कैटरीना म्हणाली, ‘ आमिरच्या ऑपज़िट ‘धूम 3’ या सिनेमामध्ये काम करणे खूप अवघड आहे. त्यामध्ये जबरदस्त ऐक्शन सीन असल्याने त्यासाठी एकदम फिट असण्याची गरज आहे. तिला स्लिम फिगर करण्यासाठी वर्कआउटच करावे लागले नाही तर, त्यासाठी डायटिंग सुद्धा करावी लागली. त्यासाठी खुपच ‘डूज़ ऐंड डोन्ट्स’ तिला फॉलो करावे लागले. फ्राइड स्टफला तर ती हात ही लावत नव्हती. चॉकलेट्सपासून आइक्रीमपर्यंत सर्व काही खाणे तिने सोडून दिले आहे.’

‘धूम 3’ मध्ये तिची जोडी आमिरसोबत चांगली दिसावी म्हणून ती प्रयत्नशील आहे. त्यामुळेच तिने वेट लॉस करण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचे समजते. या सिनेमासाठी कैटला लाइट होणे गरजेचे होते. तिला या सिनेमात ऐक्शन सीन करावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसापासून ऐक्शन सीन करण्यसाठी कैटने एक ट्रेनर अपॉइंट केला होता. सध्या कैटने तर आमिरला टक्कर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता अमीर काय तयारी करीत आहे हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.