वॉशिग्टन दि.८ – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसर्यांेदा विराजमान झालेल्या ओबामांनी विजयाची बातमी आल्याबरोबर सर्वप्रथम कुणाला फोन केला याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आता ही उत्सुकता संपुष्टात आली असून ओबामांनी पहिला कॉल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना केला असल्याचे समजते. आपल्या विजयात अन्य कुणापेक्षाही बिलचा वाटा सर्वाधिक असल्याची जाण ओबामा यांना आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी बिल किलंटन यांच्याशी संपर्क साधल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
विजयानंतर सर्वप्रथम ओबामांचा क्लिंटनना फोन
बुधवारी ओबामा यांच्या शिकागो येथील कार्यक्रमात बिल स्टेजवर उपस्थित नव्हते इतकेच काय ओबामा यांच्या विजयानंतरच्या सुंदर भाषणातही क्लिंटन यांचा उल्लेख नव्हता. मात्र क्लिंटन यांच्या प्रचार नियोजनामुळेच ओबामा त्यांच्यासाठी अवघड किंवा कळीच्या असलेल्या राज्यात मताधिक्य मिळवू शकले याची जाण ओबामा यांना होती.
अमेरिकेचे अध्यक्षपद भूषविलेल्या किलंटन यांना पदउतार होऊन बराच काळ लोटला असला तरी त्यांची अमेरिकन मतदारांवर अजूनही मोहिनी आहे. सोमवारी त्यांनी ओबामांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतील त्यांचे भाषण लक्षणीय आहे. ते म्हणतात, तुम्ही आशेसाठी मतदान करा, भीतीसाठी नको, एकतेसाठी मतदान करा, विभागणीसाठी नको, एकत्र काम करू या विचाराने मतदान करा आणि हे सारे प्रत्यक्षात यावे वाटत असेल तर ओबामांना मतदान करा. क्लिंटन यांनी ओबामांसाठी अवघड मानल्या जाणार्यार ओहिओ, पेनासिल्विनिया रॅलीत केलेल्या या भाषणामुळे बहुसंख्य कामगार वर्ग ओबामांच्या पाठिशी उभा राहिला असे सांगितले जात आहे.
परिणामी मंगळवारी रोम्नी यांनी जेव्हा पराभव मान्य करणारा आणि विजयाबद्दल अभिनंदन करणारा फोन ओबामांना केला, त्यानंतर ताबडतोब ओबामांनी किलंटन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असे प्रचार अधिकार्यां्नी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या निवडणूकीत हिलरी याही रिंगणात असल्याने विरोधक बनलेले ओबामा आणि बिल आता मात्र एकत्र आल्याचे दिसले. हिलरी क्लिंटन लवकरच सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावरून पायउतार होणार आहेत.
