कोंडी टाळणारी सिग्नल यंत्रणा

मुंग्या, वाळवी यांची वारूळे किवा मधमाशांची पोळी अतिशय गजबजलेली असतात. हा कामकरी वर्ग सतत या जागी येजा करत असतो मात्र तेथे एकदाही कधी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत नाही. काय असावे या मागचे रहस्य ? हे रहस्य शोधण्यासाठी संशोधकांनी प्रचंड संशोधन केले आणि लक्षात आले की या किटकांचे कम्युनिकेशन कौशल्य वादातीत आहे आणि त्यामुळेच हा चमत्कार घडू शकतो.

या कल्पनेवरून प्रेरणा घेऊन पिटसबर्ग येथील कार्नेजी मेलन विद्यापीठातील संशोधक ओझान टॉग्झ यांनी व्हर्च्युअल ट्राफिक लाईट या नावाची कंपनी स्थापन करून वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करणारी सिग्नल यंत्रणा तयार केली आणि त्याचे पेटंटही घेतले आहे. ही यंत्रणा वापरात आणली तर वाहतूक कोंडीची समस्या ४० ते ६० टक्कयांनी घटते असे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कमी वेळात लोक कामाच्या ठिकाणी अथवा आपल्या डेस्टीनेशनच्या ठिकाणी पोहोचू शकणार आहेत असा त्यांचा दावा आहे. सिग्नल किलअर मिळाल्यामुळे पेट्रोलची बचत होणार आहे तसेच प्रदूषणाचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे.

ही यंत्रणा वाहनांतच बसविली जाणार असून गर्दीतील वाहनांना डायरेक्शन देण्याचे काम करणार आहे. वाहनांच्या एका मोठ्या गटाला जेव्हा वाहनात हिरवा दिवा दिसेल तेव्हाच दुसर्याह ताफ्यातील वाहनांना लाल दिवा दिसणार आहे. पहिला ताफा पास झाला की आपोआपच दुसर्या  ताफ्याला हिरवा दिवा दिसणार आहे . नॅशनल हायवे, वाहतूक सुरक्षा प्रशासन व खासगी गटांवर या यंत्रणेचा चांगला प्रभाव पडला असून त्यांनी त्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलर्सचा फंड देऊ केला आहे. या सिग्नल यंत्रणेचे काम २००९ सालातच सुरू करण्यात आले आहे असेही समजते.