गेल्या काही दिवसापासून विद्या बालन भलतीच फॉर्ममध्ये आहे. डर्टी सिनेमामधील तिचे हॉट सीन गाजल्यापासून आता सर्वांचे लक्ष तिच्या येणा-या सिनेमाकडे लागले आहे. आगामी काळात ती ‘घनचक्कर’ या सिनेमात इम्रान हाश्मी सोबत झळकणार आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचे शूट सुरु आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाच्या शूटवेळी इमरान व विद्याने काही इंटीमेंट सीन्स शूट केले असल्याचे समजते.
विद्या आणि इमरान ही जोडी राजकुमार गुप्ताच्या ‘घनचक्कर’ या सिनेमात एकत्रित काम करीत आहेत. या सिनेमात दोघेजन हज़्बंड आणि वाइफचा रोल करीत आहेत. त्यामुळे इमरान आणि विद्याने काही इंटीमेट सीन्स शूट केले आहेत. ‘घनचक्कर’ हा सिनेमा जरी कॉमेडी असल्याचे म्हटले जात असले तरी हा सिनेमा कॉमेडी नसून विद्याचे या सिनेमात काही हॉट सीन असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसात रिलीज झालेल्या सिनेमातून विद्याची हॉट इमेज पुढे आली असून ही तिची बदलती इमेज सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्यासोबतच या सिनेमात सीरियल किसर अशी इमेज असलेला इमरान हाशमी काम करीत असल्याने हा सिनेमा कॉमिडी सोबतच बोल्ड देखील असणार आहे. त्यामुळे आगामी काळात येणा-या या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.