२१ वर्षानंतर रंगणार अजय-यशराज युद्ध

२१ वर्षापूर्वी म्हणजेच २२ नोव्हेंबर १९९१ रोजी दीपावलीच्या मुहुर्तावर अजय देवगनचा ‘फूल और कांटे’ हा सिनेमा आणी यशराज बैनरचा ‘लम्हे’ हा सिनेमा एकमेकासमोर आले होते. एकिकडे बैनर मोठे व त्यामध्ये स्टार मंडळी होती, तर दुसरीकडे बैनर छोटा आणि हिरो नवा असे समीकरण होते.

लम्हे’ मध्ये त्या काळाचा सुपर स्टार अनिल कपूर आणि तिच्यासोबत श्रीदेवी हे देखील काम करीत होती. हा सिनेमा यश चोपड़ाने डायरेक्ट केला होता. तर ‘फूल और कांटे’ मध्ये अजय देवगन आणि मधु या दोघांना त्याकाळी कोणीच ओळखत नव्हते. या सिनेमाचा डायरेक्टर कुकू कोहली त्यावेळी नवीनच होता. त्यावेळी अजयचा पहिला सिनेमा ‘लम्हे’ च्या पुढे पडेल असे वाटत होते. ज्यावेळी बॉक्स ऑफिसचा रिजल्ट आला त्यवेळी तो वेगळाच होता. अजयच्या एक्शनपुढे अनिल आणि श्रीदेवीचा रोमांस फेल गेला होता. त्यावेळी ‘फूल और कांटे’ जबरदस्त हिट झाला होता.

त्यामुळे पुन्हा यावर्षी १३ नोवेंबर रोजी दीपावलीच्या मुहूर्तावर २१ सालच्या इतीहासची पुनरावाती होणार आहे. अजय देवगनचा ‘सन ऑफ सरदार’ आणि यशराजचा ‘जब तक है जान’ आता पुन्हा आमने-सामने येत आहेत. यावेळेस मात्र दोनही मोठे बैनर आहेत आणि दोघेपण मोठे स्टार आहेत. त्यामुळे यावेळेस बॉक्स ऑफिस वर कोण धमाका करणार याबाबत उत्सुकता लागली आहे. यशराज बैनरचा सिनेमा रोमांसवर आधारित आहे तर अजयचा सिनेमा ऐक्शन सोबत कॉमिडीवर आधरित आहे.