आज कैटरीना कैफने जरी बॉलीवूडमधील महत्वाकांक्षाचे शिखर गाठले असले तरी तिची आगामी काळात प्रेक्षकाच्या सतत आठवणीत राहणा-या सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. तिला अशा सिनेमात अभिनय करायचा आहे की, तिचा हा अभिनय कायमच प्रेक्षकाच्या मनात राहील. हा एकंदरीत कल्ट सिनेमा असायला हवा अशी तिची इच्छा आहे.
कैटरीनाला करायचा आहे यादगार सिनेमा
किती तरी वर्षानंतर आज नरगिसच्या अभिनयामुळे ‘मदर इंडिया’ फेमस झाला होता. तर मीना कुमारीला आज ही ‘पाकीजा’ या सिनेमासाठी ओळखले जाते, नूतनला ‘बंदिनी’ साठी, शबाना आजमीला ‘अंकुर’ साठी आणी स्मिता पाटिलला ‘वारिस’ या सिनेमामुळे ओळखले जाते. त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून स्वतची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
तसे पहिले तर आपल्या येथे पुरुष केंद्रित भारतीय समाज असल्याने बॉलीवूडमध्ये महिलाना केंद्रित करून कमीच प्रमाणात सिनेमाची निर्मिती होते. अभिनयासाठी आज ही महिलापेक्षा पुरुषांना जास्त मानधन दिले जाते. सध्याच्या स्टार अभिनेत्री असलेल्या कैटरीना कैफ आणि करीना कपूरपेक्षा दुप्पट मानधन त्यांना दिले जाते. त्यशिवाय गंभीर बाब म्हणजे महिलाप्रधान सिनेमा देखील प्रेक्षकांना आवडत नाहीत.
अशा परीस्थित कैटरीना कैफला एक सार्थक सिनेमा करण्यची इच्छा आहे. मात्र याकाळातील फिल्ममेकर तिला अशाप्रकारची संधी देतील का हे मात्र आज तरी सांगता येत नाही. सध्याचे फिल्ममेकर सुद्धा प्रतिभाशाली आहेत, परंतु उद्योगाचे आर्थिक समीकरण त्यांना महिला केंद्रित सिनेमा तयार करण्यापासून रोखत आहे.
