कोलकाता: कोळशाने चेहेरा काळवंडलेले केंद्र सरकार साफसफाईच्या प्रयत्नात असून निर्धारित कालावधीत उत्पादन सुरू करू न शकलेल्या १३ कोळसा खाणींचा परवाना लवकरच रद्द केला जाईल; अशी ग्वाही कोळसा खाणमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी दिली आहे.

कोल इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोळसा खाण प्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिगटाने या खाणींचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून त्यानुसार नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. विधी मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर परवाने रद्द करण्यात येतील; असेही जयस्वाल यांनी सांगितले. ज्या कंपन्या वेळेत कोळसा उत्पादन करू शकलेल्या नाहीत; त्यांच्या कडून विलंबाच्या कालावधीत अपेक्षित असलेल्या रोयल्टीएवढी रक्कम त्यांच्या बेंक गेरेंटी मधून वसूल करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
कोळसा क्षेत्राच्या नियमनासाठी नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्याची धोरण निश्चिती करण्यासाठी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. या मंत्रिगटाची बैठक पुढील महिन्यात अपेक्षित असून त्यानंतर नियमाची स्थापना करण्यात येईल; असेही जयस्वाल यांनी सांगितले.