रेल्वे प्रवासासाठी ओळखपत्र आवश्यक

नवी दिल्ली: तिकीटाचा काळा बाजार, गैरवापर रोखण्याबरोबरच रेल्वे प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सर्वच रेल्वे प्रवाशांकडे स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय दि. १ डिसेंबरपासून सर्वांना लागू असेल; अशी माहिती रेल्वे प्रवक्त्याने दिली.

सध्या रेल्वेच्या प्रवासादरम्यान इंटरनेटद्वारे अथवा तत्काळ सेवेत तिकीट काढणारे प्रवासी आणि वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी यांनाच ओळखपत्र आवश्यक होते. आतामात्र सर्व श्रेणीच्या प्रवाशांना आपले मूळ ओळखपत्र प्रवासादरम्यान दाखवावे लागेल.