फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका अवार्ड फंक्शनसाठी मेकअप मॅन मिक्की ने धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा मेकअप करण्यास नकार दर्शविला आहे. त्याने काही दिवसापूर्वीच माधुरी दीक्षित सोबत केलेले कांट्रेक्ट तोडून नवाबची म्हणजेच सैफ अली खानची नवीन पत्नी करीना कपूर सोबत नवीन कांट्रेक्ट केले आहे. यापूर्वी बॉलीवुडच्या या दोन स्टार नायिकेचा मेकअप मिक्की करीत होता. बॉलीवुडमध्ये मात्र सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे.
मिक्कीने गाला अवार्डच्यावेळी अचानक माधुरीचा मेकअप करण्यास नकार दर्शविला. रेड कारपेटच्या पहिल्यादिवशी परफॉरमेंस करतेवेळी मिक्कीने मेकअप केला असल्याने माधुरी चांगली दिसत होती. त्यामुळे मेन इवेंटच्या दिवशी सुद्धा मिक्की तिला गॉडी लुक देइल अशी तिची अपेक्षा होती. मिक्कीच्या भरवशावर ती बिनधास्त होती, मात्र अचानक मेन इवेंटच्या दिवशी मिक्कीने माधुरीला मेकअप करण्यास नकार दर्शविला. त्यामुळे या मेन इवेंट दिवशी मात्र करीनाने बाजी मारत माधुरीला मागे टाकले.
आगामी काळात आता माधुरीला गेल्या कित्येक दिवसापासून तिचा मेकअप करणा-या मिकीला विसरावे लागणार आहे. आता त्याच्या जागी नवीन मेकअप मॅनची नियूक्ती तिला करावी लागणार आहे.