
नवी दिल्ली दि.३१ -आज दुपारी चार वाजता इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणखी एक प्रकरण उघड करणार असून यावेळचे प्रकरण चांगलेच मोठे असेल असे त्यांनी ट्वीट केले आहे.

नवी दिल्ली दि.३१ -आज दुपारी चार वाजता इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणखी एक प्रकरण उघड करणार असून यावेळचे प्रकरण चांगलेच मोठे असेल असे त्यांनी ट्वीट केले आहे.
अरविंद केजरीवाल गेले काही दिवस बड्या राजकीय नेत्यांची भ्रष्टाचार प्रकरणे चव्हाट्यावर आणत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा आणि डीएलएफ यांच्यातील व्यवहार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे जाहीर केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे मंत्री सलमान खुर्शीद यांच्या स्वयंसेवी संस्थेतील गैरव्यवहारही पुराव्यानिशी उघड केले. त्यामुळे आज कुणाचा नंबर असेल याची उत्सुकता राजकीय पक्षांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही वाटते आहे.
दरम्यान भाजपचे मुखपत्र असलेल्या कमल संदेश वर्तमानपत्रातून केजरीवाल यांना मिळणारा निधी कुठून मिळतो याची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यावरही केजरीवाल यांनी त्यांना मिळणार्यार निधीची माहिती वेबसाईटवर असल्याचे सांगून भाजपात खरे गट असतील तर त्यांनी त्यांना १० वर्षात मिळालेले निधी कुठून आले याची माहिती जाहीर करावी असे आव्हान दिले आहे.