प्रियंकाने केला चेक परत

बॉलीवूडपुढे आदर्श ठेवावा असे काम अभिनेत्री प्रियंका चोप्राने केले आहे. तिने नुसताच प्रड्यूसरचा चेकच परत केला नाही, तर तिच्या बीजी शेडूलमधून वेळ काढून अर्धवट राहिलेल्या या सिनेमाचे शूट देखील तिने पूर्ण करून दिले आहे. यापूर्वी तिने या प्रड्यूसर सोबत प्रॉजेक्ट केले असल्याने त्यांचे आभार मानत तिने हा चेक परत केला असल्याचे समजते.
प्रियंकाने प्रड्यूसर असलेल्या के. सी. बोकाडि़या यांच्या सोबत ‘दीवाना मैं दीवाना’ या सिनेमात काम केले होते. या सिनेमात प्रियंकाच्या सोबत अभिनेता गोविंदा देखील होता. मात्र काही कारणामुळे हा सिनेमा बरेच वर्ष अर्धवट अवस्थेत रखडला होता,मात्र काही दिवसापूर्वी प्रड्यूसर के. सी. बोकाडि़या याने हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्याचे ठरविले. त्यासठी उर्वरित शूटचे काम प्रियंकाने तिच्या बीजी शेडूलमधून वेळ काढून पूर्ण केले. त्या कामाचा मोबदला म्हणून बोकाडि़या याने प्रियंकाला १८ लाखाचा चेक दिला होता. मात्र हा चेक प्रियंकाने न घेता त्यांना परत दिला.
पहिल्यदा तर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. मात्र प्रियंकाने हा चेक परत करून सर्वासमोर आदर्श ठेवला आहे. आजकालच्या जमान्यात अशा प्रकारचे स्टार मिळणे कठीण झाले असताना प्रियंकाने मात्र ते काम सहजपने पार पाडले आहे.