वॉशिंग्टन, ३१ ऑक्टोबर-चार वर्षापूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती बनले होते लोकांची जितकी नजर बराक ओबामांवर होती तितकीच चर्चा मिशेल ओबामांनी जमा केली होती. आजच्या रोजी त्यांना राजकीय स्टार मानले जाते ज्या खुप लोकप्रिय आहेत. परंतु नेहमी असे होत नाही. २००८ मध्ये जेव्हा ओबामांची निवडणुक मोहिम सुरू होती तेव्हा काही टिकाकारांनी मिशेल यांना रागीट व कटु म्हटले होते.
टिकाकारांनी यासाठी प्रिंस्टनमध्ये त्यांच्या जमा केलेल्या थेसिसचा हवाला दिला होता. यात त्यांनी गोर्याचे बहुमत असणार्या कॉलेजमध्ये काळ्या समुदायाचे विद्यार्थी असण्याच्या परिणामावर चर्चा केली होती. लोकांचे म्हणणे होते की, वंशाचा त्यांच्या मेंदूवर हावी आहे. मागील निवडणुक प्रचारदरम्यान मिशेल यांनी वत्त*व्य दिले होते, मोठे झाल्यानंतर पहिल्यांदा मला अमेरिकेवर अभिमान होत आहे. या वक्तव्यावर खुप वाद झाला होता. त्यांना गैर देशभक्त देखील सांगण्यात आले.
परंतु नंतर मिशेल यांनी आपले व आपल्या प्रतिमेचा कायाकल्प केला. लोकांनी नवीन मिशेलला पाहिले जी प्रेम करणारी पत्नी होती, आई होती आणि मुलगी होती. सांगितल्या जाते की, सुरूवातीला मिशेल यांना बराक ओबामांच्या राजकीय महत्वाकांक्षेवर आक्षेप होता. परंतु ’द ओबामाज’ पुस्तक लिहणारी जोडी केंटर म्हणते की, जेव्हा मिशेल यांनी बराक ओबामांना समर्थन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या ओबामाच्या सर्वात मोठ्या समर्थक बनतात. जे लोक मिशेल यांना दिर्घकालावधीपासून जाणतात ते म्हणतात की, मिशेल स्पष्टवादी आहेत. त्या हावर्डमध्ये प्रशिक्षणप्राप्त वकील आहेत. त्यांना आपल्या पतीचे तर्क समोर ठेवण्यात विश्वास होता. परंतु लोकांवर याचा चांगला परिणाम झाला नाही. शक्यतो यामुळे की, सामान्यपणे राजकीय नेत्यात्च्या पत्नी आशयावर असतात आणि शक्यतो यामुळे की, मिशेलसाठी हे सर्व नवीन होते.
अमेरिकेतील प्रा बॉनी डाउ म्हणतात की, २००८ मध्ये ही धारणा बनु लागली होती की, मिशेल निवडणुक प्रचारातील अडथळा आहे. जेव्हा स्पष्ट होऊ लागले की, मिशेलमुळे नुकसान होऊ शकते तेव्हा त्यांची प्रतीमा बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला.
२००८ मध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे डेनवरमध्ये झालेल्या राष्ट्रीय संमेलनात मिशेल यांनी भाषण देऊन म्हटले की, मी येथे एक पत्नी, एक आई व एक मुलीप्रमाणे उभी आहे… मग येथूनच त्यांची प्रतीमा बदलू लागली.
राष्ष्ट्रपती बनल्यानंतर जेथे बराक ओबामांची रेटिंग ढासळू लागली दुसरीकडे मिशेलची रेटिंग वाढत राहिली. मे २०१२ मध्ये गेलअपच्या सर्वेक्षणात ओबामांची रेटिंग ५२ टक्के होती तर मिशेलची ६० टक्के.