’जब तक है जान’वर पाकिस्तानात बंदी?

नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर-दिवंगत निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट ’जब तक है जान’ला पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास बंदी लादली जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरूख खानला काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या एका ऑपरेशनमध्ये सहभाग घेतल्याचे दाखवण्यात आल्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंग्रेजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियानुसार पाकिस्तानमध्ये विविध वाहिन्यांवर चित्रपटाचा ट*ेलर दाखवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरूखला सैन्यदलाच्या बॉम्बरोधक दलाचा सदस्य दाखवण्यात आले आहे. अद्याप हा चित्रपट पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डासमोर परवानगीसाठी गेलेला नाही.