गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये देशी गर्ल होण्यासाठी शर्यत लागली आहे. त्यासाठी आता दीपिका पादुकोन सुद्धा तयारीला लागली आहे. दीपिकाने या निमिताने तिचा लूक काहीसा चेंज केला आहे. दीपकाची ही तयारी तिचा आगामी काळात येत असलेल्या रामलीला या सिनेमासाठी आहे. या सिनेमामध्ये ती रणवीर सिंहच्या अपोजीट काम करत आहे.
या सिनेमात ती गुजराती तरुणीची रोल करीत आहे. त्यामुळे सध्या तिचे ड्रेस डिझायनर घाघरा चोळी तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. या थोड्याशा हटके लूकमध्ये दीपिका झळकणार आहे. गुजराती ड्रेस तयार करण्यासाठी ती व तिची ड्रेस डिझायनर सध्या खूप मेहनत घेत आहेत .
सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे या रामलीला सिनेमासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे दीपिकाला सुद्धा या सिनेमा बाबत सतर्क राहवे लागणार आहे. कारण की एक वेळी सिनेमाच्या सेटवर रणवीर हा शेव न करता आला होता. त्यावेळी संजयने त्याला बराच वेळ धारेवर धरले होते. त्यामुळे आगमी काळात काम करताना दीपिकाला बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. सध्या रामलीला या सिनेमाचे शूट सुरु आहे.