वॉशिग्टन दि.२० – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बराक ओबामा आणि रोमनी यांच्यातील चुरस वाढत चालली असतानाच नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या समारंभाची तयारीही सुरू झाली आहे. ६ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत आहे.

अमेरिकन घटनेप्रमाणे नवीन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी २० जानेवारीला होतो मात्र यंदा या दिवशी रविवार आल्याने हा सोहळा २१ जानेवारीला पार पडणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात शपथविधी २१ जानेवारीला होण्याचा हा प्रकार आत्तापर्यंत सहावेळा झाला असून यंदाची वेळ सातवी आहे. यापूर्वी रेनॉल्ड रिगन दुसरे यांचा शपथविधी २१ जानेवारी १९८५ ला झाला होता.
विशेष म्हणजे २१ जानेवारी मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर) दिवस म्हणूनही पाळला जातो. प्रेसिडेंटच्या शपथविधीच्या दिवशी येणारा हा दुसरा फेडरल हॉलीडे ठरणार आहे. पहिल्यांदा अशी वेळ बिल क्लिंटन यांनी दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी आली होती. आत्ताच्या शपथविधीसाठी काँग्रेशनल कमिटीने तयारी सुरू केली असून नवीन वेबसाईट आणि फेसबुकचे पेजही तयार करण्यात येत आहे असे कमिटीचे अध्यक्ष चार्लस श्रुमेर यांनी सांगितले.