कोलकाता: केंद्र सरकार हे ब्रेनडेड रुग्णासारखे असून ते जेमतेम सहा महिने टिकेल; अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

कोलकाता: केंद्र सरकार हे ब्रेनडेड रुग्णासारखे असून ते जेमतेम सहा महिने टिकेल; अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
केंद्र सरकारची धोरणे जनहिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे देशभर सरकार आणि काँग्रेस यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे. देशात काँग्रेसविरोधी प्रचंड लाट येईल आणि लोक या सरकारला खाली खेचतील; असे ममता यांनी सांगितले.
सरकारची सध्याची अवस्था ब्रेनडेड रुग्णासारखी आहे. या रुग्णांचा वास्तविक मृत्यू झालेला असतो. मात्र कृत्रिम का होईना; श्वास सुरू असतो म्हणून त्याला कोणी मृत म्हणत नाहीत. या सरकारची अवस्था तशीच असून हे सरकार मृत झाल्याचे कोणी स्वीकारत नाहीत. मात्र सहा महिन्यात त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही; अशी टीकाही ममता यांनी केली.