डोळ्यांमध्ये प्रत्यारोपण केली जाऊ शकणारी एक छोटी दुर्बीण शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. दृष्टिदोष दूर करण्यासाठी ही दुर्बीण अतिशय उपयुक्त ठरणार असून ज्या लोकांची दृष्टी कमकुवत होत आहे त्यांच्या आयुष्यात हे उपकरण प्रकाश आणू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेमध्ये या अनोखा दुर्बीणीला मान्यताही मिळाली आहे.
दृष्टिदोष दूर करणारी दुर्बीण
डोळ्यांच्या नैसर्गिक दृष्टिपटलाच्या जागी ही दुर्बीण जोडली जाणार असून तिच्यामुळे दृष्टिदोष असलेले तिपटीने सुस्पष्ट पाहू शकतील. हे उपकरण समोरच्या वस्तूची प्रतिमा मोठी करून बुबुळाच्या निरोगी भागापर्यंत पोहोचविते. त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशनमध्ये अशा लोकांना मोठा लाभ होणार आहे. ही दुर्बीण केवळ एकाच डोळ्यात लावली जाईल. परिणामी, दोन्ही डोळ्यांची प्रतिमा एकत्र करण्याची सवय होण्यास काही दिवस लागू शकतात. पण एकदा सवय झाल्यानंतर चष्म्यापासून कायमची सुटका होऊ शकते.
