न्यूजर्सी – एका मोटर गॅरेजमध्ये काम करणार्या एका युवकाने निडरपणाची हद्द केली. तो ज्या गॅरेजवर करीत होता तेथून एक संगणक चोरला . काही महिने या संगणकाचा वापर केला. मात्र ते बिघडल्यानंतर तो संगणक घेऊन पुन्हा परत आला. जुना संगणक गॅरेजमध्ये टाकून नवीन संगणक चोरला. पोलिसांच्या माहितीनुसार, कंटेमपरेरी मोटरकार नामक गॅरेजमधून गतवर्षी जूनमध्ये एक संगणक चोरीला गेला होता. तेथे नोकरी करीत असलेल्या एका २९ वर्षीय युवकाची चौकशी केली गेली नाही. कारण काही दिवस आधीच नोकरी सोडून तो त्रिनिदादला गेला होता.
चोरलेला कम्प्युटर बिघडला – पुन्हा नवीन चोरला
काही दिवसांपूर्वी तो शहरात परतला होता, असे सांगितले जाते. एक दिवस आपल्या जुन्या सहकार्याला भेटण्यासाठी गॅरेजवर आला होता. तो आपल्याबरोबर कॉफी आणि केकदेखील घेऊन आला होता. तेव्हा गॅरेज कर्मचार्यांच्या लक्षात आले की, तो लागलीच गायब झाला. मग त्यांच्या लक्षात आले की जे जुने संगणक चोरीला गेले होते ते पुन्हा आपल्या जागी ठेवले होते आणि दुसरे एक नवीन संगणक चोरीला गेले होते.
