
सचा खेरा,१० ऑक्टोबर-भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, कायदा बनविण्याची जबाबदारी संसदेकडे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस व न्यायव्यवस्थेकडे आहे. त्यामुळे खाप पंचायत किंवा इतर कोणीही कायदे बनवू नयेत, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवार) ठणकावून सांगितले.
हरियानामध्ये गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर तीने आत्महत्या केली होती. या मुलीच्या कुटुंबियांची आज सोनिया गांधी यांनी जिंद येथे जाऊन भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ’’बलात्कार प्रकरणी दोषी आढळणार्यांना कडक कारवाई करण्यात येईल. बलात्काराच्या घटना देशामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर कारवाई करण्याची गरज आहे. बलात्काराच्या घटना फत्त* हरियानामध्येच घडत नसून, देशभर अशा घटना घडत आहेत. त्यामुळे दोषींनी कडक शासन होणे गरजेचे आहे.’’
हरियानामध्ये गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या घटना घडल्यानंतर प्रथमच एका राष्ट*ीय नेत्याने हरियानामध्ये जाऊन पिडीत कुटुंबियांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे हरियानाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी अद्याप एकाही पिडीत कुटुंबाची भेट घेतलेली नाही.
