सैफ-करीनाच्या लग्नाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

सैफ अली खान व करीना कपूरच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. शर्मिला टागोरने या विवाहाचे निमंत्रण महामाहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिले आहे. त्यासाठी शर्मिला टागोर याने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुखर्जी यांनी विवाहनिमित्त आशीर्वाद दिले आहेत.

गेल्या काही दिवसापासून इंडस्ट्रीजमध्ये सैफ व करीना कपूरच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. लग्नजवळ आल्याने कपूर व खान फॅमिलीच्यावतीने सध्या तयारी जोरात सुरु आहे. सध्या सैफची आई शर्मिला टागोर सर्वांना निमंत्रण देण्यात व्यस्त आहे. इइंडस्ट्रीजमधील अनेक मान्यवरांना लग्नाचे निमंत्रण देऊन झाल्यानंतर आता त्यांनी या विवाहाचे निमंत्रण महामाहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिले आहे.

निमंत्रण दिल्याने महामाहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या लग्नाला उपस्थित राहणार की नाही हे समजू शकले नाही. मात्र या लग्नाला सीमित मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या लग्न सोहळ्याची वेळ कमीच ठेवण्यात आली आहे. लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शन कार्यक्रमाला अनेक मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याचे समजते.