परेश रावलया आठवड्यात परेश रावलचा ’ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आपला देवावर विश्वास नसल्याचे परेश रावल यांनी सांगितले आहे. या चित्रपटातील त्यांची भूमिकाही काहीशी अशाच पार्श्वभूमिवर आधारीत आहे. परंतु असे असले तरी देवापेक्षा आपल्याला बायकोची भीती असल्याचे परेश रावल यांनी काहीशा अशा शब्दात म्हटले.
मी मंदिरात जाणार्यांपैकी नाही. मी दगडाच्या मूर्तीत जीव असल्याचे मानीत नाही आणि ज्यात जीव आहे, त्याला दगड समजू शकत नाही. मला वाटते की तुमचे चांगले कर्म हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे. माझा देवावर विश्वास नाही. मात्र कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर विश्वास तर ठेवावा लागेल ना. मी देवाला घाबरत नाही मात्र माझ्या बायकोला नक्कीच घाबरतो.
परेश रावल यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे त्यांनाच माहीत. पण याचा फायदा त्यांना ’ओह माय गॉड’ साठी नक्कीच होणार आहे. ओह माय गॉड या चित्रपटाची कथा गुजराथी ’कांजी विरुद्ध कांजी’ या नाटकावर बेतलेली आहे.