शाहरुख दिसणार पुन्हा रोमांटिक स्टायलमध्ये

बॉलीवूडचा किंग खान असलेला शाहरुख खान बऱ्याच दिवसानंतर त्याच्या रोमांटिक स्टायलमध्ये स्क्रीनवर झळकणार आहे. आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक यश चोप्राच्या या सिनेमात तो या हटके रोल मध्ये दिसणार आहे. त्यामुळे शाहरुखची ही पूर्वीची क्रेझ किती जणांना पसंत पडेल हे काही दिवसातच समजेल.

शाहरुख खानच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमाबाबत एक-एक पत्ते साफ होत असल्याने त्याबाबतची एक्सइटमेंट दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्यांदा पोस्टर त्यानंतर सिनेमाचे नाव आणि ट्रेलरला प्रेक्षकाने पसंती दर्शवली आहे. काही दिवसापूर्वीच शाहरुखच्या या सिनेमातील सॉंग यू टयूबवर डाऊनलोड करून काही तास झाले आहे. त्याला आतापर्यन्त हजारो हिट ही मिळाले आहेत. दोन दिवसात हा आकडा सहा लाख पेक्षा अधिक झाला आहे.

गुलजारचे लिरिक्स व ए. आर. रेहेमानच्या म्यूजिक सोबत रब्बी शेरगिलची आवाज आहे. या गाण्याला थोडासा पंजाबी टच देण्यात आला आहे. या गाण्यात शाहरुख खान गीटार वाजवीत असल्याचे चित्रित करण्यात आले आहे.