रॅम्पवर चालण्यासाठी प्रियंकाची एक कोटीची डिमांड

इंडस्ट्रीजमध्ये कधी कोणाचा भाव वाढेल हे सध्या तरी काही सांगता येत नाही. आता बॉलीवूडची अवखळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंकाचेच उदहरण घ्या ना सध्या ती फॅशन शोसाठी रॅम्पवर चालण्यासाठी एक कोटी रुपये इतके मानधन मागत आहे.

प्रियंकाची ही डिमांड ऐकून आयोजक हैराण झाले आहेत. ‘बर्फी’ हा सिनेमा यशस्वी झाल्याने गेल्या काही दिवसापासून प्रियांकाचा भाव मार्केटमध्ये चांगलाच वधारला असल्याची चर्चा होती. मात्र आता प्रियंकाने एवढे मानधन मागण्यास सुरुवात केल्याने सर्वचजन अडचणीत सापडले आहेत.

एवढे मानधन मागितल्याने प्रियंका या शो मध्ये दिसणार नाही. आयोजकाच्या मते स्टेजवर वॉक करण्यासाठी आघाडीच्या अभिनेत्र्याना लाखो रुपायांचे मानधन दिले जाते. मात्र प्रियांकाची एक कोटी रुपयाची मागणी खुपच जास्त आहे. या शो साठी यापूर्वीच अभिनेत्री कैटरीना कैफने देखील एक कोटी रुपयाची ऑफर केली होते. त्यामुळेच आयोजकाने प्रियंकाकडे विचारणा केली असल्याचे समजते