
मुंबई दि. १ – देशाच्या किनारपट्टीवरील राज्यात पुन्हा एकदा समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला यंदाच्या डिसेंबरमध्ये किवा नवीन वर्षात जानेवारीत होणार असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाला मिळाली असून त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व राज्यात अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. इराण आणि भारत यांच्यात समुद्राखालून घालण्यात आलेली पाईपलाईन उध्वस्त करणे हाच या हल्ल्यामागचा प्रमुख हेतू असल्याचे व त्यासाठी ५० उत्तम प्रशिक्षित दहशतवाद्यांचे पथक तयार करण्यात आले असल्याचेही गुप्तवार्ता विभागाला समजले आहे. या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानी आयएसआयने प्रशिक्षित केले आहे.
