दिग्दर्शक करण जोहरची ओळख बॉलीवूडमध्ये शाहरुख खानचा जवळचा मित्र म्हणून आहे. आतापर्यतच्या करणाच्या सिनेमात हिरो म्हणून पहिल्यांदा किंग खानला एन्ट्री मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसापासून शाहरुखचे मार्केट डाउन झाले असल्याचे आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे करणने आगामी सिनेमासाठी शाहरुख ऐवजी सलमानला साइन केले आहे. यापूर्वी सलमानने धर्मा प्रोडक्शनच्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात सुमारे १४ वर्षापूर्वी म्हणजेच १९९८ साली काम केले होते.
बॉक्स ऑफिसवर हिट सिनेमा देण्याची जादू फक्त सलमान खानकडे असल्याचे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. सलमान वर जर १०० रुपये खर्च केले, तर तो १००० रुपये कामवून देऊ शकतो. त्यामुळेच करणच्या तोंडात आता शाहरुख ऐवजी सलमानचे नाव सतत येत आहे.
गेल्या काही दिवसापासून शाहरुखचे मार्केट भलतेच डाउन झाले आहे. त्यामुळे सलमान जर करणाच्या सिनेमातून झळकला तर यापूर्वी बॉलीवूडमध्ये ‘दोन जिस्म आणि एक जान’ अशी ओळख असलेले करन व शाहरुख मात्र आता वेगळे होतील. यापूर्वी करणमुळे शाहरुखचे ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभ गम’, ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘माय नेम इज खान’ हे सिनेमे हिट झाले होते. त्यामुळे शाहरुखला नंबर वनच्या रेस मध्ये आतापर्यत राहता आले होते. मात्र येणारा काळ मात्र त्याच्यासाठी कठिण जाणार असे दिसत आहे.