भाजप मध्यावधी निवडणुकीस सज्ज: गडकरी

सूरजकुंड: घोटाळ्यात बुडालेले केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्यास असमर्थ असून भारतीय जनता पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी सदैव सज्ज असल्याची ग्वाही भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक येथे आज सुरू झाली. त्यावेळी गडकरी बोलत होते.

भाजप केंद्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत नाही. मात्र भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा विळखा, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे कुरघोडीचे राजकारण यामुळे केंद्र सरकार कमालीचे अस्थिर झाले आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातही या सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही; असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचेही ते म्हणाले.