दीपिका व अनुष्कात रणवीरमुळे वाद

बॉलीवूडमध्ये सध्या पसरलेल्या आफवावर विश्वास ठेवयाचे म्हटले तर, दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा या आघाडीच्या दोन्ही अभिनेत्रीनी एकमेकाशी कोणतेच रिलेशन न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून या दोघीच्या मैत्रीमध्ये रणवीर सिंह आल्यामुळे त्यांची मैत्री तुटली असल्याचे समजते.

सूत्राने दिलेल्या महितीनुसार गेल्या काही दिवसापासून दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्यातील वाढत्या संबंधामुळे अनुष्का काहीशी चिंतीत आहे. दीपिका व रणवीर दोघेपन एकमेकासोबत जास्त वेळ घालवत असल्याने अनुष्काची चिंता भलतीच वाढली आहे. सध्या दोघेपण दिग्दर्शक रामलीला भन्साळीचा ‘रामलीला’ हा सिनेमा करीत असल्याने त्यांची जवळीकता वाढली आहे.

दीपिका व रणवीरच्या या खास संबंधामुळे अनुष्कासोबतची मैत्री रणवीरने कमी केली आहे. दीपिका व रणवीर स्क्रीनवर काम करित असताना डायनामिक व सिजलिंग दिसत आहेत. त्यामुळे अनुष्काला सध्या नाराज होण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे चिडून अनुष्काने दीपिका सोबत न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.