नवी दिल्ली: अण्णांचे स्थान आमच्या हृदयात अढळ असून अण्णा हजारे आम्हाला सोडून गेल्याचा प्रचार अयोग्य आहे; असे स्पष्टीकरण एकेकाळच्या टीम अण्णांचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

नवी दिल्ली: अण्णांचे स्थान आमच्या हृदयात अढळ असून अण्णा हजारे आम्हाला सोडून गेल्याचा प्रचार अयोग्य आहे; असे स्पष्टीकरण एकेकाळच्या टीम अण्णांचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.
दिल्लीतील अवाजवी वीज बिलाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या मोर्चानंतर केजरीवाल पत्रकारांशी बोलत होते.
अण्णांना राजकारणाचा तिटकारा आहे. आम्हाला राजकारणात येण्याची हौस नाही. मात्र अनिवार्यतेने राजकारणाची सफाई करण्यासाठी राजकारणात उतरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही; असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. अण्णांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे आणि तो कायम राहील; असेही त्यांनी सांगितले.
एक आठवड्यापूर्वीच केजारीवालांच्या पक्ष स्थापनेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करून अण्णांनी केजारीवालांच्या राजकीय आंदोलनात आपले नाव आणि छायाचित्र न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.