शौरी यांचा भाजपला घरचा आहेर

भोपाळ: डीझेल दरवाढ आवश्यकच होती असे सांगत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अरुण शौरी यांनी सरकारला धारेवर धरणार्या भाजपला घराचा आहेर दिला. थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करणे निरर्थक असल्याचेही शौरी म्हणाले.

एका परिषदेसाठी भोपाळला आलेल्या शौरी यांनी परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधला. डिझेलची दरवाढ आवश्यक आणि अनिवार्यच होती; असे सांगत त्यांनी आपल्याच पक्षाला चिमटा काढला. रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीने कोणताही फायदा होणार नसला तरी फारसे नेकासानाही होणार नाही. त्यामुळे परकीय गुंतवणुकीचा बागुलबुवा उभा करून त्या विरोधात आगपाखड करणे निरर्थक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

या निर्णयांनी पंतप्रधान मामामोहन सिंग यांनी प्रथमच आपली ताकद दाखवून दिल्याचेही शौरी म्हणाले.