मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच त्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांना बळीचा बकरा बनविल्याचा आरोप पूर्वी अण्णांच्या ब्लॉगचे लेखन करणारे पत्रकार राजू परुळेकर यांनी केला. पठारे यांनी मात्र परुळेकरांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

अण्णा हजारे यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांच्या अनुयायांमध्ये आणि राळेगणच्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे अन्नाचे परिस्थिती बिकट बनली आहे. गावकरी अण्णांच्या विरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. या नाराजी आणि संतापाला उतारा म्हणून अण्णांनी पठारे यांचा बळी दिल्याचा आरोप परुळेकरांनी केला आहे.
सुरेश पठारे यांच्यावर यापूर्वी अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबाबत गावकर्यांनी अनेकदा अण्णांकडे तक्रार केली. मात्र त्यावेळी अण्णांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता प्रकरण आपल्यावरच शेकण्याची परिस्थिती निर्माण होताच पठारे यांनी दूर केले; असा परुळेकर यांचा दावा आहे.