बॉलिवूडमध्ये ’डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. तो म्हणजे विद्या बालन… पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहते आहे अशी पक्की बातमी आहे.
सुरुवातीला विद्याने कितीही नाही नाही म्हणत असली तरी यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूरसोबत तिची जवळीक आता सर्वांच्याच लक्षात आली आहे. आणि त्यांचे हेच प्रेमाचे संबंध लवकरच एका प्रेमळ नात्यात होणार असल्याचे समजतेय. विद्या आणि सिद्धार्थ या वर्षीच्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजंतय.
नाही म्हणायला, विद्याने मागच्या वर्षी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अनेक प्रायव्हेट पार्टीज आणि परदेश वार्यांमध्ये ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. नुकतेच त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी आपल्यासाठी एक नवे घरंही विकत घेतल्याची बातमी कळली होती. विद्या आणि सिद्धार्थच्या जवळच्या एक व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी सध्या व्यस्त आहे ती लग्नाच्या तयारीत… आणि हे लग्न डिसेंबर २०१२मध्ये होण्याची शक्यता आहे.
पण, विद्या आणि सिद्धार्थ दोघांनी मात्र अजूनही आपल्या लग्नाबद्दल अळीमिळी गुपचिळीचेच धोरण स्विकारले आहे. असो… विद्याचे चाहते ही बातमी ऐकल्यानंतर नक्कीच खूश होऊन तिला शुभेच्छा देतील.