नोव्हेंबर महिन्यात मिस्टर फेपरक्शनिस्ट अमीर खानचा बहुचर्चित तलाश हा सिनेमा रिलीज होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आमिर ख़ानच्या ‘तलाश’ या सिनेमाची फैन्स मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत. सगळ्यांनाच माहित आहे की, आमिर म्हणजेच मिस्टर परफेक्शनिस्ट सिनेमाच्या प्रमोशनसाठी नेहमीच नवीन फंडा शोधून काढतो. दोन वर्षानंतर रिलीज होत असलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिर खान कोणतीच कमी ठेवायला तयार नाही.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार ‘तलाश’ च्या प्रमोशनसाठी आमिर खान लवकरच ‘सीआईडी’ मध्ये दिसणार आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिरने सोनी टीवीवरील चर्चित शो असलेल्या ‘सीआईडी’ ची मदत घेण्याचे ठरविले आहे. तलाश हा एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात आमिर खान पोलीस असलेल्या सुर्जन सिंह शेखावतची भूमिका करीत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी अमीर खान हा आईला सोबत घेऊन हज यात्रेला गेला होता. त्यामुळे तो या सिनेमाचे प्रमोशन करत नसल्याच्या अफवा सर्वत्र पसरविण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून अमीर हा प्रमोशनच्या कामात पुन्हा सक्रीय झाला असून त्याने या कामासाठी सर्व शहराला भेटी देत आहे.