सोनाक्षी थिरकणार आणखीन एका आयटम सॉंगवर

इंडस्ट्रीजमध्ये सध्या टॉपच्या नायिकामध्ये आयटम सॉंग करण्याची चढाओढ लागलेली दिसत आहे. त्यामुळेच एका नंतर एक असे आयटम सॉंगवर या हिरोईन थिरकत आहेत. त्यामुळेच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा येत्या काळात आणखीन एका आयटम सॉंगवर थिरकताना दिसणार आहे. सध्या आयटम सॉंगवर थिरकत कैटरीना कैफने बॉलीवूडमधील अव्वलस्थान टिकवले आहे. त्यामुळेच आता सोनाक्षीने आयटम सॉंगवर थिरकत नंबर वनवर लक्ष केंद्रित केले आहे.

काही दिवसापूर्वीच सोनक्षीने अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या सिनेमासाठी आयटम सॉंग सदर केले आहे. त्यानंतर तिने आता आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक तिन्ग्माशु धुलियाच्या ‘बुलेट राजा’ या सिनेमातही आयटम सॉंगवर थिरकणार आहे. या सिनेमात सोनाक्षी बंगाली ब्युटीची भूमिका सादर करीत आहे. ‘रावडी राठोड’च्या फुलझडी आणि ‘दबंग’ मधील तिच्या भूमिकेपेक्षा वेगळी असणार आहे.

सोनाक्षीने या आयटम सॉंगसाठी दिग्दर्शक प्रभू देवाच्या सांगण्यावरून खूप मेहनत घेतली आहे. तिचा हा आयटम सॉंग असलेला ‘ओह माय गॉड’ हा सिनेमा २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या आयटम सॉंग हिट ठरेल अशी तिची अपेक्षा आहे.