इस्लामाबाद,१७ सप्टेंबर-पाकिस्तानमधील एका न्यायालयाने कराची शहरात समुद्र किनार्यावर असलेले २०० वर्षे जुने हिंदू मंदिर न पाडण्याचा आदेश दिल्याचे, वृत्त माध्यमांनी दिले आहे.

इस्लामाबाद,१७ सप्टेंबर-पाकिस्तानमधील एका न्यायालयाने कराची शहरात समुद्र किनार्यावर असलेले २०० वर्षे जुने हिंदू मंदिर न पाडण्याचा आदेश दिल्याचे, वृत्त माध्यमांनी दिले आहे.
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिंध उच्च न्यायालयाने कराची पोर्ट ट*स्टला (केपीटी) कराचीतील नेटिव्ह जेटी ब्रिज येथे असलेले श्री स्वामी नारायण मंदिर न पाडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश मुशीर आलम यांच्या खंडपीठाने हा आदेश सुनाविला आहे. न्यायालयाने अधिकार्यांना या मंदिराची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या मंदिराच्या आवारात राहणारे कैलाश विश्राम यांनी न्यायालयात याचिका दाखल करत म्हटले होते, की एका खासगी कंपनी केपीटीच्या मदतीने याठिकाणी मंदिर पाडून इमारत उभी करण्याची योजना आखत आहे. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करत हे मंदिर न पाडण्याचे आदेश दिले.